आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Aurangabad
  • दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, दोघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर जखमी Two Death In Two Wheeler Accident At Hingoli

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या, दोघांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- तालुक्यातील जोडतळा पाटीवर दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन त्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे  गंभीर जखमी झाले. यातील जखमींवर प्राथमिक उपचार चालू असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला नांदेड येथे हलविण्यात आले आहे.

 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार, एका दुचाकीवरून दोघे शाळेतील काम आटोपून हिंगोलीकडे परत येत होते. तर दुसरे दोघे दुचाकीने हिंगोलीवरून सिरसमकडे जात असताना माळहीवरा पाटीवर हा अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही दुचाकींची चाके उखडून पडली. शिवाय दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुराडा झाला. तातडीने चौघांनाही हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले.

 

सिद्धार्थ इंगोले, शेख अमीन यांचा जागीच मृत्यू झाला तर शेख रमजान व  वडदकर नावाच्या व्यक्तीला हिंगोली येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर अपघातात ठार झालेल्या दोघांची उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दर्शवणारे फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...