आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कटुता संपुष्ठात... मुंडे भगिनींच्या राजकारणाला नितिन गडकरींची बळकटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबद्दल बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांत जी कटुता निर्माण झाली होती ती कटुता गडकरी यांच्या बीड जिल्ह्याच्या दौर्‍याने संपली आहे. भाषणातच गडकरींनी पालकमंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रितम मुंडे यांच्या पाठीशी सामान्य जनतेने भक्कमपणे उभे रहावे असे आवाहन केल्याने त्यांच्या राजकारणाला पुन्हा एकदा बळकटी मिळाली आहे. बीड जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या चौदा कामाच्या भूमिपुजनाच्या निमित्ताने केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी अंबाजोगाई हजेरी लावली.

 

या कार्यक्रमात गडकरी यांनी मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला. अनेक वेळा गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे बीड जिल्ह्यात येता आले. त्यांच्या निवडणूकीचा अर्ज भरण्यासाठी ही येथे आलो असल्याचे गडकरी यांनी सांगत गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला एक चांगली दिशा मिळाली होती हे मान्य केले.

 

गोपीनाथ मुंडे भाजपाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना गडकरी हे नागपुर युवकचे अध्यक्ष होते असे सांगुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.गोपीनाथ मुंडे बीड जिल्ह्यातील गरीब,मजुर, शेतकरी यांच्यासाठी ते शेवटच्या क्षणापर्यंत काम करीत राहिले. भाजपाची सत्ता आल्यानंतर पहिला साखर कारखाना वैद्यनाथच्या रूपाने त्यांनी सुरू केला. तेंव्हा ही मी परळीला आलो होतो.त्यांच्यामुळे साखर कारखानदारी सुरू करण्याची प्रेरणा मला मिळाली असे   गडकरी यांनी सांगीतले आज गडकरी यांचे तीन कारखाने चालतात असे ही गडकरी यांनी सांगितले. मुंडे भगिनींनी या कार्यक्रमात गडकरी यांच्याबद्दल कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला.प्रितम मुंडे यांनी तर मुंडे साहेब उपमुख्यमंत्री असताना बीड जिल्ह्यात रस्ते झाले होते. आता 20 वर्षानंतर बीड जिल्ह्यातील रस्त्याचा विकास होत आहे. या रस्त्याच्या विकासासाठी न भूतो न भविष्यती निधी मिळाला. आम्ही न भूतो म्हणू परंतु भविष्यती म्हणणार नाहीत कारण भविष्यात आम्हाला गडकरी यांच्याकडुन आणखी निधीच  गरज लागणार आहे. असे प्रितम मुंडे यांनी सांगितले. तर पंकजा मुंडे यांनी गडकरी साहेबांनी बीड जिल्ह्यासाठी दिलेला निधी मोलाचा असून कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे सांगितले.  गोपीनाथ मुंडे यांनी नेहमीच बेरजेचे राजकारण केले. तसेच आपण करणार असल्याचे सांगितले. विरोधकांनी बीड जिल्ह्याची विकासाची भूक भागविली नाही परंतु आता गडकरी यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास होत आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आम्ही विधानपरिषदेत  मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलो.पंकजा मुंडे या आमच्या सरकारमधील अभ्यासु ग्रामविकास मंत्री असल्याचे सांगुन   कौतुक केले.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा...गडकरी यांचे मुंडे भगिनींना पाठबळ

 

 

बातम्या आणखी आहेत...