आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीला पळवून नेल्याने मानसिक धक्का बसलेल्या महिलेने केली आत्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड-  गावातील दोघांनी मुलीला पळवून नेल्याचा मानसिक धक्का बसलेल्या महिलेने विष घेत आत्महत्या केल्याची घटना परळी तालुक्यातील खोकरमोहा येथे घडली. याप्रकरणी  मुलीला पळवून नेणाऱ्या दोघांविरोधात परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

   
परळी तालुक्यातील खोकरमोहा येथून शैलेश बालाजी दहिफळे व सिद्धेश्वर बालाजी दहिफळे यांनी गावातीलच  एका मुलीला पळवून नेले हाेते, अशी माहिती पोलिसांनी दिली. मुलीला पळवून नेल्याचा जबर मानसिक धक्का मुलीच्या आईला बसला.  यातूनच त्यांनी १९ एप्रिल रोजी विष घेतले होते. उपचारासाठी त्यांना अंबाजाेगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान २० एप्रिल रोजी  त्यांचा मृत्यू झाला होता.

 
या प्रकरणी सोमवारी महिलेच्या पतीने परळी ग्रामीण पोलिसांत  शैलेश व सिद्धेश्वर बालाजी दहिफळे यांच्याविरोधात पत्नीच्या आत्महत्येला कारणीभूत ठरल्याप्रकरणी तक्रार दिली. गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास फौजदार कांबळे हे करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...