आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीचा विवाह का करता; जाब विचारणाऱ्या तरूणास नातेवाईकांकडून बेदम मारहाण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड-आठव्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विवाह का करता, असा जाब विचारणार्‍या एक मुलाला मुलीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात ही घटना घडली आहे. संदीप निवृत्ती चौधरी (वय-32) या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली असून तो गंभीर जखमी आहे.

 

सूत्रांनुसार, गेवराई तालुक्यातील तळेवाडी येथील अल्पवयीन मुलीचा येत्या 12 मार्च रोजी विवाह होणार आहे. या विवाहाला संदीप चौधरी या तरुणाने विरोध दर्शवला होता. मुलगी अल्पवयीन आहे तिचा विवाह का करता, असा जाब त्याने मुलीच्या नातेवाईकांना केला होता. यावर मुलीच्या नातेवाईकांनी लोखंडी पाईप, काठ्यांनी संदीप याला बेदम मारहाण केली.

बातम्या आणखी आहेत...