आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरमध्ये जिल्हा परिषद शाळेत 142 विद्यार्थ्यांना विषबाधा, 6 जण गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- जळकोट तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 150 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी घडला. मध्यान्ह भोजनानंतर काही वेळात या विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. सर्व विद्यार्थ्यांना वाढवणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

जळकोट तालुक्यातील मंगरुळ येथे जिल्हा परिषदेची इयत्ता 1 ली ते 7 वीपर्यंतची शाळा आहे. बुधवारी दुपारी नेहमीप्रमाणे मध्यान्ह भोजन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना जुलाब आणि उलटीचा त्रास सुरू झाला. एकापाठोपाठ १५० विद्यार्थ्यांना हा त्रास होत असल्याचे पाहून पालक आणि शिक्षकांनी त्यांना जवळच असलेल्या वाढवणा (बु.) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी इतर ठिकाणाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना तातडीने वाढवण्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती अाता ठीक असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना सांगितले. पालकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठी गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...