आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JALNA तीन मुलींना भरधाव कारने ठोकरले; एक ठार, दोघी गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना -  शिकवणीसाठी जात असलेल्या तीन मुलींना पाठीमागून भरधाव कारने  धडक दिल्याने एक मुलगी ठार, तर दोन मुली गंभीर जखमी झाल्या. ही घटना देऊळगावराजा रोडवरील वाघ्रूळजवळ गुरुवारी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घडली. अपघातात राजश्री दत्तू शेळके (१७) ही ठार झाली असून अंजली वानखेडे, सीमा शिंदे   (सर्व रा. इंदलकरवाडी ता. जालना) या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत.   अपघातानंतर कार चालक कारसह पसार झाल्याने वाहनाचा क्रमांक दिसत नव्हता. परंतु, देऊळगावराजानजीक हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे वाहन क्रमांकही उघडकीस येऊन आरोपीचाही तपास लागला.  


राजेश्री शेळके, अंजली वानखेडे, सीमा शिंदे या मुली क्लासेससाठी सकाळीच येत होत्या. दरम्यान, शुक्रवारी सकाळी या तीनही मुली पाणंद रस्त्यातून देऊळगावराजाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला गावात जाण्यासाठी थांबल्या होत्या. याचवेळी जालन्याहून ट्रक व पांढरी इंडिगो कार भरधाव वेगाने येत होती.  कारचालकाने ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कार मुलींच्या घोळक्यात घातली. यामुळे या तीनही मुली गंभीर जखमी झाल्या. यात राजेश्री शेळके हीचा मृत्यू झाला, तर अंजली वानखेडे, सीमा शिंदे या गंभीर जखमी झाल्या.  

बातम्या आणखी आहेत...