आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

JALNA: पदभार घेल्यानंतर अवघ्या तीन तासांतच जिल्हाधिकारी परतले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जालना जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन तासांतच अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडे पदभार देऊन जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना परतावे लागले. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शासनाने त्यांची नियुक्ती रद्द केल्याचे सूत्रांनी सांगितले. 
१६ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांची बदली झाल्यापासून जिल्हाधिकारी पद रिक्त आहे. शासनाने येथे मीरा भाईंदर पालिकेचे आयुक्त बळीराम पवार यांची नियुक्ती केली होती. मात्र त्यांनी पदभार न घेतल्याने गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

 

त्यानुसार काळे यांनी गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता अप्पर जिल्हाधिकारी पी.बी. खपले यांच्याकडून पदभार स्वीकारला. मात्र गोंदिया लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार झाल्याने ४९ ठिकाणी फेर मतदान घ्यावे लागले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या शिफारशीनुसार त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असताना काळे यांना पदभार देता येणार नसल्याने शासनाने त्यांची नियुक्ती रद्द करून परत बोलावले. त्यानुसार रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पुन्हा अप्पर जिल्हाधिकारी खपले यांच्याकडे पदभार देऊन काळे परत फिरले.

बातम्या आणखी आहेत...