आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस भरतीची तयारी करणारे दोघे तरुण ठार; भरधाव ट्रकने दुचाकीला दिली धडक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना -   भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोनजण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास मोतीबागेलगतच्या स्विमिंग पुलासमोर घडली. महादेव दामोदर वैद्य (२०), गौरव सुभाष वैद्य (२१, दोघेही रा. शिरनेर, ता.अंबड) अशी मृतांची नावे आहेत. या दोन्ही तरुणांची ४ जून रोजी मुंबईत परीक्षा होणार होती. परंतु, सरावासाठी क्रीडा संकुलावर आलेल्या तरुणांवर काळाने घाला घातला. 

  
औरंगाबाद चौफुली येथून भरधाव जाणारा टाटा कंपनीच्या ट्रकने (एचआर ६५ ए ६५५१) स्विमिंग पुलाजवळ क्रीडा संकुलाकडून येणाऱ्या होंडा शाईन दुचाकी (एमएच २१ एसी १८२२) ला जोराची धडक दिली. या अपघातात महादेव दामोदर वैद्य याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गौरव सुभाष वैद्य हा लांब जाऊन पडला. याला  उपचारासाठी नेताना त्याचाही मृत्यू झाला. याची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शेजूळ यांच्यासह पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास शिंदे, आर. एन. जोंधळे, शेख खलील, पी. एम. झाले, जी. एन. तेजनकरांनी घटनास्थळी धाव घेतली. चालक ट्रक सोडून पळून गेला.    ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

 

 

बातम्या आणखी आहेत...