आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन गटांत हाणामारी; दोन जण गंभीर जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आडूळ - न्यायालयात दावा दाखल असलेल्या जमिनीच्या वादातून आडूळ तांडा (ता. पैठण) येथे दोन गटांत जोरदार हाणामारी झाल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार (ता. २६) रोजी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. यासंबंधी दोन्ही गटांतील परस्परांविरुद्ध सात जणांवर पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


जमिनीच्या   वादातून दोन गटात शाब्दिक बाचाबाची होऊन याचे रूपांतर लाठ्याकाठ्यांच्या तुंबळ हाणामारीत झाले. यात शेख अनिस याच्या डोक्यात भाऊसाहेब जाधव याने कुऱ्हाडीने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला, तर भाऊसाहेब जाधव हादेखील यात जखमी झाला आहे. याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...