आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूसंपादन अधिकाऱ्याच्या चौकशीसाठी एसीबीला पत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद -  येथील राष्ट्रीय महामार्ग विशेष प्रकल्पांतर्गत संपादित जमिनीचा मावेजा देताना शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याबाबतच्या तक्रारी वाढल्या होत्या. याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन अधिकारी विशेष प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांची चौकशी करण्यात यावी, असे पत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहे.    


उस्मानाबाद जिल्ह्यातील चार राष्ट्रीय     महामार्ग गेले असून यातील तीन राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरणाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. यासाठी शेकडो शेतकऱ्यांच्या जमिनी तसेच नागरिकांच्या मालमत्ता रस्ता विस्तारीकरणासाठी संपादित करण्यात आल्या आहेत. परंतु हक्काच्या जमिनी, जागा, घरे देऊनही त्याचा मावेजा मिळवताना मात्र शेतकऱ्यांसह नागरिकांची प्रचंड हेळसांड झाली. 


हक्काच्या पैशासाठीच त्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या. टक्केवारीशिवाय मावेजाच मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्याने याबाबत दैनिक दिव्य मराठीने १५ मे रोजी वृत्त प्रकाशित करून हा सर्व प्रकार चव्हाट्यावर आणला होता. याची गांभीर्याने दखल घेत जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पत्र लिहून उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांची चौकशी करण्यास सांगितले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...