आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीचा खून करणाऱ्या पत्नी, प्रियकराला जन्मठेप; बीडच्या तदर्थ सत्र न्यायाधीशांचा निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या  मदतीने  गळा दाबून खून करून  पुरावा नष्ट करणाऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराला परिस्थितीजन्य पुराव्यावरून दोषी ठरवत  बीडच्या तदर्थ सत्र न्यायाधीश नाजेरा शेख यांनी बुधवारी दुपारी  जन्मठेप व दाेन हजार रूपये दंडाची शिक्षा ठोठावली.  महिलेचा मुलगा  व शिर्डी येथील हॉटेल मॅनेजरची  साक्ष महत्वाची ठरली. बीड तालुक्यातील बेलुरा येथील या घटेनचा निकाल ऐकण्यासाठी  न्यायालयात ग्रामस्थांनी गर्दी केली होती.


 बेलुरा येथील आशा तुकाराम पांचाळ  (वय ३४ )या विवाहितेचे  गावाजवळील  नवगण राजुरी येथील सलूनचालक  बाळासाहेब वैद्य  (४०) याच्या बरोबर प्रेम संबध जुळले होते. या प्रेमसंबंधात  पती तुकाराम पांचाळ हा अडसर येत असल्याने  २३ मे २०१४ रोजी पहाटे  आशा व बाळासाहेब याने तुकारामला संपवण्याचा कट रचला.  तुकाराम  झोपेत असताना त्याचा  दोघांनी गळा आवळून  खून   केला.  तुकारामच्या छातीत दुखत  असल्याने त्याला नवगण राजुरीच्या रूग्णालयात  नण्याचे नाटक केले. डॉक्टरांनी  तपासणी करून बीड येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करा असे सांगितले होते. परंतु  अाशा व बाळासाहेब याने तुकारामला  दवाखान्यात न नेता थेट  घरी आणले.

 

तुकारामचा मृत्यू झाल्याने गावात एकच चर्चा सुरू झाली. नातेवाइकांचा आरडा ओरड पाहून गावातील पोलिस पाटलांनी बीड ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली.   पोलिसांनी  तुकारामचा मृतदेह ताब्यात घेवून  जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. उत्तरीय तपासणीत तुकारामचा मृत्यू   गळा  दाबल्याने झाल्याचा डॉक्टरांनी  वैद्यकीय  अहवाल दिला.  या प्रकरणी तुकाराम यांचा भाचा युवराज कांबळे याने बीड ग्रामीण ठाण्यात  दिलेल्या तक्रारीवरून आशा पाचांळ व बाळासाहेब वैद्य या दोघांवर गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. तत्कालीन पोलिस निरीक्षक फुले यांनी  या प्रकरणी तपास  करून या खून प्रकरणाचे बीड जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.

 

२३ साक्षीदार तपासले  
 न्या.  नाजेरा शेख  यांच्या न्यायालयासमोर सरकार पक्षाच्या वतीने २३ साक्षीदार तपासण्यात आले. तुकाराम पांचाळ याचा मुलगा युवराज याची साक्ष महत्वाची ठरली. घरी कोणी नसतंना बाळासाहेब  अाशाला भेटण्यासाठी येत होता.  आई आम्हाला घराबाहेर पाठवत असे, युवराजने सांगितले. यावर न्यायाधीशांनी  आशा व बाळासाहेब  यांना  दोषी ठरवूनजन्मठेप व  दाेन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.   सरकारच्या वतीने अॅड. मिलिंद वाघीरकर यांनी काम पाहिले.

बातम्या आणखी आहेत...