आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेसबुकवरून प्रेम; 26 वर्षांच्या तरुणीसाठी 17 वर्षीय मुलाचे पलायन, 18 हजार रुपयेही नेले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- फेसबुकवरून जुळलेले मैत्रीचे बंध नंतर प्रेमात बदलले. ती राजस्थानची तर तो बीडचा. त्याला, त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ती थेट राजस्थानातून बीडमध्ये आली अन् ज्याच्यावर आपण प्रेम करतो तो आपल्यापेक्षा ९ वर्षांनी लहान फक्त १७ वर्षांचा विद्यार्थी असल्याचे तिला समजले. तरीही तिने त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली, आपण त्याच्याशी लग्न केले असते मात्र, आता विचार करावा लागेल असे म्हणून ती परत गेली. इकडे दुसऱ्याच दिवशी तिच्यासाठी तोही चक्क घरातून निघून गेला. अखेर कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली.  

 
हुसेन (बदलेले नाव) शहरातील बालेपीर भागात राहतो, सध्या बारावीच्या वर्गात शिकत आहे. जवळपास सहा महिन्यांपूर्वी फेसबुकवरून त्याची ओळख पूनम नावाच्या एका मुलीशी झाली. मैत्री झाली, हळूहळू संपर्क वाढला अन् सहाच महिन्यांत मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. एकमेकांशी लग्न करण्याची तयारीत दोघेही होते. पण, हुसेन, त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी शनिवारी पूनम बीडमध्ये आली. तिला घेऊन हुसेन थेट घरी गेला अन् कुटुंबीयांना सगळा प्रकार सांगितला. इकडे ज्याच्याशी आपण लग्नाचा विचार करत होतो तो १२ वीचा विद्यार्थी असल्याचे शिल्पाच्या (बदललेले नाव)लक्षात आल्याने तिनेही लग्नाच्या निर्णयाचा फेरविचार करावा लागेल असे हुसेनच्या कुटुंबीयांना सांगितले. शिवाय, त्यांनीच तिला औरंगाबादपर्यंत परत नेऊनही सोडले.

 

...अन् हट्टापायी तो घरातून पसार  
इकडे लग्न करेन तर तिच्याशीच असा हट्ट करून बसलेल्या हुसेनची घरच्यांनी समजूत काढली मात्र, तो ऐकायला तयार नव्हता. रविवारी तो घरातून निघून गेला तो परत आला नाही. कपाटातील १८  हजार रुपयेही त्याने नेले आहेत. या प्रकरानंतर हुसेनच्या कुटुंबीयांनी शिवाजीनगर पोलिसांत धाव घेत अज्ञाताविरोधात अपरहणाची तक्रार दिली आहे.   

 

तपास सुरू आहे  
फेसबुकवरच्या ओळखीतून हा प्रकार घडला. गुन्हा नोंद झाला असून तपास सुरू आहे. तरुणीच्या विरोधात कुटुंबीयांनी तक्रार दिलेली नसल्याने अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. घरातून पलायन केलेला युवक अद्याप  सापडला नाही.   
- आर. ए. शेख, पोलिस उपनिरीक्षक, शिवाजीनगर ठाणे.

   

बातम्या आणखी आहेत...