आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय अधिका-यांना दणका, निवासस्‍थान सोडण्‍यापूर्वी भरावे लागणार संपूर्ण Light bill

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - यापुढे शासकीय निवासस्‍थान सोडताना अधिकारी, कर्मचा-यांना वीज देयकाची थकबाकी नसल्‍याचे प्रमाणपत्र सादर करण्‍याचे आदेश महावितरणने दिले आहे. हे प्रमाणपत्र महावितरणकडून प्राप्‍त करून नंतर ते संबंधित कार्यालयाकडे सादर करावी लागणार आहेत. त्‍यानंतरच अधिकारी, कर्मचा-यांना शासकीय निवास्‍थान सोडता येणार आहे. 

 

शासकीय निवासस्‍थानाच्‍या वीज बिलाचा आकडा सातत्‍याने वाढत चालला आहे. अशात शासकीय निवासस्‍थानांची थकबाकी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. त्‍यावर उपाययोजना म्‍हणून महावितरणने हा आदेश दिला आहे.