आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रकच्या धडकेत पती ठार, पत्नी-चिमुकला बचावला, औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील अपघात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासूर  स्टेशन - भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी व लहान मुलगा या अपघातात बालंबाल बचावले. ही घटना औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील वरझडी फाट्यावरील पेट्रोल पंपासमोर सोमवारी सकाळी आठच्या सुमारास घडली.  ताराचंद रामचंद्र जंघाळे (२५, रा.बंदापूरवाडी, ता.खुलताबाद) असे मृताचे नाव आहे.


पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, ताराचंद जंघाळे हे पत्नी सविता हिच्यासोबत औरंगाबादला जात होते. त्याचवेळी औरंगाबादकडून येणाऱ्या भरधाव  ट्रकने  वरझडी फाट्यावर त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात  ताराचंद जंघाळे हे जागीच ठार झाले, तर त्याची पत्नी आणि चार वर्षांच्या मुलाला किरकोळ दुखापत झाली. हा अपघात एवढा भयंकर होता की  डोक्यासह हात-पायाला ट्रकच्या धडकेमुळे जबर मार लागल्याने ताराचंदचा जागीच मृत्यू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...