आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मावस बहीण-भावाचा बुडून मृत्यू, एक युवती बचावली; मृत हैदराबाद, पैठणचे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - मामाकडे आलेले मावस बहीण-भाऊ कुटुंबीयांसह बीडजवळच्या युवा शांतीवन प्रकल्पाजवळील विहिरीवर गेले असताना बुडून दोघांचा मृत्यू झाला तर एक युवती बचावल्याची घटना रविवारी घडली.   


मूळ हैदराबादची असलेली नुरजहाँ खान आदम खान (१९) ही तरुणी व तिचा मावस भाऊ मोहंमद सकीब बाबूभाई (२०, रा. पैठण)हे बीड येथील मामाकडे आले होते. रविवारी दुपारी ते कुटुंबीयांसह  युवा शांतीवन प्रकल्पाजवळ गेले होते. तलावाजवळील विहिरीत  नुरजहाँ, साकीब व हिना शेख (१८) असे तिघे उतरले होते. मात्र तिघेही पाण्यात बुडाले. नागरिकांच्या मदतीने नुरजहाँ व हिनाला बाहेर काढण्यात यश आले. डॉक्टरांनी नुरजहाँला मृत घोषित केले तर हिनाची प्रकृती चिंताजनक होती. उशिरापर्यंत मोहंमद साकीबचा  मृतदेह मिळून आला नव्हता. 
मुलगी धरणात बुडाली


माजलगाव - आत्यासोबत माजलगाव धरणावर धुणे धुण्यासाठी गेलेल्या स्वप्नजा सिद्धार्थ गायकवाड ( ६)  हिचा धरणातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी  २ वाजण्याच्या सुमारास घडली.   

बातम्या आणखी आहेत...