आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निलंगेकरांच्या गडात आज दिलीपराव देशमुखांची सभा; मतदारसंघाला सुरुंग लावण्याची तयारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मतदारसंघातील शिरूर अनंतपाळ येथे तालुका काँग्रेस कमिटीने तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच, सोसायटींचे अध्यक्ष, सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. त्यासाठी आमदार दिलीपराव देशमुख उपस्थित राहणार असून यानिमित्ताने ते पालकमंत्र्यांवर काय टिप्पणी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  
लातूर जिल्ह्यात कायम काँग्रेसचे प्राबल्य राहिले आहे. गेल्या दोन वर्षांत मात्र काँग्रेसला बाजूला सारून भाजपने मुसंडी मारली आहे. निलंगा या विधानसभा मतदारसंघातून आमदार झालेले संभाजी पाटील निलंगेकर लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत.

 

मतदारसंघाला सुरुंग लावण्याची तयारी
 भाजपमय होऊ घातलेल्या निलंगा मतदारसंघात काँग्रेसने सुरुंग लावण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे. जि.प. निवडणुकीच्या वेळी दिलीपराव देशमुख आणि पालकमंत्री निलंगेकरांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. त्यावेळी जोरदार जुगलबंदी पाहायला मिळाली होती. 

बातम्या आणखी आहेत...