आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 कि.मी.तील उसाला अतिरिक्त भाव देणार;मोहटादेवी नृसिंह शुगर्सच्यागळीत हंगामाला सुरुवात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - मोहटादेवी नृसिंह शुगर्सच्या पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ महाराष्ट्र साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांच्या हस्ते बुधवारी (दि.१०) झाला. कारखान्याने कार्यक्षेत्रातील ३० किमीच्या आतील शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त दर देण्याचे जाहीर केले आहे. 

 
शेतकऱ्यांनी पुढील वर्षी गाळपासाठी ऊस तोडणी कार्यक्रमाप्रमाणे  ऊस गाळपास पाठवावा जेणे करून सर्वांचा ऊस गाळपास येईल व शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, असे आवाहन  नागवडे यांनी या वेळी केले. खा.संजय जाधव, आ.मोहन फड, आ.मधुसुदन केंद्रे, माजी मंत्री गणेशराव दुधगावकर, हेमंतराव जामकर, बाजीराम महाराज जवळेकर यांची या वेळी  उपस्थिती होती. 
 कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, हा कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू केला असून त्यांना जास्तीत जास्त भाव देण्यात येईल, असे सांगितले. संचालक रमेश खाडे म्हणाले, कारखान्याच्या ३० किमीच्या आतील शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी घेऊन जाण्यास आम्ही कटिबद्ध असून शेतकऱ्यांना तसा करार करून देऊ, अशी ग्वाही दिली. या वेळी अॅड.न.चि.जाधव, एकनाथराव साळवे, कारखान्याचे जनरल मॅनेजर डी.के.सानप, मुख्य अभियंता श्री पांगरकर, चीफ केमिस्ट काळे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...