आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माय-लेकीने केला युवकाचा खून; विळा, कुऱ्हाडीने वार करून केली हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना/अंबड- भावकीतील महिलेला सोबत नेल्याचा राग मनात धरून आईने मुलांच्या मदतीने विळा, कुऱ्हाडीने वार करून युवकाचा खून केला. ही घटना अंबड तालुक्यातील कर्जत येथे २६ जून रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली. रामसिंह ऊर्फ राहून शामसिंह खोकड (१७, कर्जत, ता. अंबड) असे मृताचे नाव अाहे, तर पूनम मन्छाराम खोकड, रमेश मन्छाराम खाेकड या दोन भावांसह त्यांची आई या तिघांनी हा खून केला आहे. यातील एक आरोपी पूनम हा जालना येथील एसआरपीएफमध्ये नोकरीस आहे. 


कर्जतच्या रामसिंह खोकड याने भावकीतील एका महिलेस तीन महिन्यांपूर्वी जालना येथे सोबत नेले होते. काही दिवस राहून ते परत आले होते. यामुळे समाजात बदनामी झाली होती. याचा मनात राग धरून पूनम मन्छाराम खोकड, रमेश मन्छाराम खाेकड व त्यांची आई हे तिघे २६ जून रामसिंहच्या घरी गेले. तेथे गेल्यानंतर त्यांनी रामसिंहवर कुऱ्हाड, विळा, लोखंडी पाइपने वार केले. या हल्ल्यात रामसिंह हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विळा, कुऱ्हाड, लोखंडी पाइपने मारहाण केल्यामुळे डोक्यात व कानाजवळ मोठा रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मृताची आई जमुनाबाई शामसिंह खोकड यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर पोलिस निरीक्षक नांदेडकर, सोन्ने, पीएसआय शेख आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. घटनास्थळावरून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबड येथील रुग्णालयात पाठवला. 


खुनासाठी वापरलेले साहित्य जप्त 
युवकावर हल्ला केल्यानंतर आरोपींनी विळा, लोखंडी रॉड हे साहित्य जागीच टाकले होते. पोलिसांनी हे साहित्य जप्त करून घेतले. हे साहित्य कोठून आणले, या साहित्याचा अगोदर काही वापर झाला काय याबाबत तपासणी सुरू आहे. 


तपास सुरू : एसआरपीएफमध्ये नोकरीस असलेला या घटनेतील आरोपी पूनम यास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरू असल्याची माहिती पीएसआय शेख यांनी दिली. 

बातम्या आणखी आहेत...