आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राष्ट्रवादीत’ला पाच दिवसांचा अनुभव वाईटच, सध्या भाजपतच; रमेश कराड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट उमेदवारी दिली होती. परंतु पाच दिवसांत त्या पक्षात वाईट अनुभव आल्यामुळे आपण निवडणुकीच्या मैदानातून माघार घेतली. सध्या आपण भाजपत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात काम करीत राहणार     असल्याचे रमेश कराड यांनी “दिव्य मराठी’ला दिलेल्या खास मुलाखतीत सांगितले. 

 

कराडांना उमेदवारी मागे घ्यावी लागली असे पडद्यामागे नक्की काय घडले हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र त्याचे उत्तर जनतेला मिळाले नव्हते. विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर दिव्य मराठीने त्यांच्याशी संवाद साधला आणि ही सर्वांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.  


> रमेश कराड यांच्याशी झालेली प्रश्नोत्तरे
भाजप का सोडली?  

कराड : राजकारणात अनेक गोष्टी घडत असतात. त्यातल्या काही सांगायच्या असतात आणि काही बाबी जाहीरपणे सांगता येत नाहीत. भाजप का सोडली होती? याचेही उत्तरही सांगता येणार नाही.   


राष्ट्रवादीमध्ये कुणाच्या पुढाकाराने प्रवेश झाला होता? 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मला पक्षात घेतले.   दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी माझी विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर केली.  

 

राष्ट्रवादीत पाच दिवसांत काय अनुभव आला?
मी दोन मे रोजी उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्याच दिवशी उमेदवारी मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. मी लगेचच उमेदवारी अर्ज भरला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पक्षाचा एबी फार्म मला दिला. तोपर्यंत सगळे ठीक होते. परंतु पुढचे पाच दिवस मला अनेक वाईट अनुभव आले. विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी काही पैसे खर्च करावे लागतील याची खूणगाठ बांधली होती. परंतु प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी पट जास्त पैसे खर्च करावे लागतील अशा सूचना मला येऊ लागल्या. मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्याकडे एवढे पैसे नसल्याचे मी स्पष्टपणे सांगितले.

 

एखाद्या निवडणुकीत किती पैसे खर्च करायचे? हा प्रश्न तर आहेच. त्यामुळे मी थेट शरद पवारांना फोन करून निवडणुकीतून माघार घेत असल्याचे कळवले आणि राष्ट्रवादीतूनही बाहेर पडलो.

 

धनंजय मुंडेंमुळे राष्ट्रवादीत गेलात आणि पंकजांमुळे परत आलात असे म्हटले जात आहे ? 

दिवंगत नेते गोपीनाथरावांशी माझे कौटुंबिक संबंध होते. धनंजय यांच्याशीही नातेसंबंध आहेत. पंकजा  यांच्याशी तर बहिणीचे नाते आहे. लातूरमधील भाजपच्या काही स्थानिक प्रश्नांमुळे मी अस्वस्थ होतो. त्यातच विधान परिषदेवर जावे हा विचार माझ्या मनात आला. मी शरद पवारांना भेटून राष्ट्रवादीत गेलो. कुणा एखाद्यामुळे गेलो असे नाही.  पंकजा मुंडे यांच्यासोबतचे नाते संपलेले नाही, हे मी राष्ट्रवादीत प्रवेशादिवशीच जाहीरपणे सांगितले होते. मानलेले नाते तर रक्ताच्या नात्यापेक्षाही मजबूत असते असे माझे मत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...