आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासिंगअभावी 540 ट्रक आरटीओ ऑफिससमोर उभे; बीडच्या आरटीओ कार्यालयाचा सावळागोंधळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- आरटीओ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व ट्रकचा अभावा या कारणामुळे मागील एक महिन्यापासून ५४० ट्रकची अद्याप पासिंग झाली नाही. ही वाहने बीडच्या आरटीओ ऑफिसमोर उभी आहेत. ना हरकत मिळाली तर  योग्यता प्रमाणपत्र मिळत नसल्याने ट्रकचालकांची आरटीओ यांच्याकडून अडवणूक करण्यात येत असल्याचा आरोप बीड जिल्हा  मोटार चालक मालक संघटनेचे सरचिटणीस सय्यद मुस्तफा यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला आहे.


बीड येथे आरटीओ ऑफिस असूनसुद्धा ट्रकची पासिंग होणे मुश्कील झाले आहे. विशेष म्हणजेे बीडमध्ये आरटीओ ऑफिस १९७२ ला  सुरू झाले तेव्हापासून बीडला ट्रॅक नाही. वाहनांचे रेकॉडही उपलब्ध नाही.  सध्या बीडच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ऑफिससमोर मागील एक महिन्यापासून जिल्ह्यात ५४० ट्रक  पासिंगअभावी उभे आहेत. या ट्रकमालकांनी कोल्हापूर येथून ना हरकत आणली असली तरी त्यांच्या वाहनांची बीडमध्ये पासिंग केली जात नाही. बीडमध्ये ट्रॅक नसल्याने अंबाजोगाई आरटी ऑफिसला ट्रक पाठवले जात आहेत. परंतु या ठिकाणी गेलेल्या ट्रक मालकांची लवकर पासिंग करून घेतली जात नाही. ट्रकची पासिंग आरटीओकडून केली जात असल्याने जिल्ह्यातील ट्रक मालकांना त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. सोमवारी पत्रकार परिषदेस मोटार मालक फय्याज खान, गणेश नलावडे आदी उपस्थित होते. 

 

जालन्यातून बीडचा कारभार  

यापूर्वीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ए.ए.खान यांची बदली झाल्यांनतर बीडच्या आरटीओ ऑफिसला अजूनही पूर्णवेळ आरटीओ मिळालेला नाही. सध्या जालना येथील शेख सलीम यांच्याकडे बीडचा अतिरिक्त पदभार आहे, असे सय्यद मुस्तफा यांनी सांगितले.   

 

१४ डिसेंबरला रास्ता रोको  

आरटीओ ऑफिसमध्ये पासिंगसाठी ट्रॅकच नाही. याबाबत जिल्हा मोटार चालक मालक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. परंतु कोणतीच कारवाई झाली नसल्याने आता १४ डिसेंबर रोजी  आरटीओंच्या विरोधात बीड बायपासवर सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.

 

ट्रॅकसाठी पर्यायी जागेची मागणी केली  

 जिथे ट्रॅक आहे तिथे वाहनांची पासिंग केली पाहिजे. बीड येथे ट्रॅक व्हावा यासाठी घोसापुरीला जागा मिळाली होती. बांधकाम विभागाला शासनाकडून निधीही मंजूर झाला, परंतु हे प्रकरण कोर्टात गेले आहे.

- शेख सलीम, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

 

बातम्या आणखी आहेत...