आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैजापुरात बोंडअळी बाधित क्षेत्रासाठी साडेचौदा कोटी प्राप्त, तहसीलदार मोरे यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - गेल्या खरीप हंगामात कपाशीवरील बोंडअळीमुळे बाधित झालेल्या क्षेत्रासाठी शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी ९८ कोटी ७५ लाख रुपयांची पहिल्या हप्त्याची रक्कम मंजूर करण्यात आली असून त्यापैकी ७९ कोटी रुपयांचा निधी सर्व तालुक्यांना वितरित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत.

 

वैजापूर तालुक्यासाठी १४ कोटी ४९ लाख ९० हजार रुपयांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार सुमन मोरे यांनी दिली. नुकसान भरपाईचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेतर्फे लवकरच वर्ग करण्यात येणार असल्याने कपाशीवरील बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील खरीप हंगामात शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली.


कपाशीचे जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांनी बीटी कॉटनची लागवड केली होती. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी तालुक्यातील वैजापूर, खंडाळा, शिऊर, लोणी खुर्द, गारज, लासूरगाव, महालगाव, लाडगाव, नागमठाण व बोरसर या मंडळात ७७ हजार ५८० हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली होती, पण पहिली वेचणी झाल्यानंतर कपाशीवर बोंडअळीचे आक्रमण झाले. त्यामुळे कपाशीचे १०० टक्के क्षेत्र बाधित झाले.

 

तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्या पथकाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून तहसीलदारांमार्फत अहवाल पाठवण्यात आला. तालुक्यातील ९५ हजार ७५८ शेतकऱ्यांच्या  कपाशीवरील बोंडअळीमुळे आर्थिक नुकसान झाले होते. या शेतकऱ्यांच्या कपाशीचे ३३ टक्केपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाल्याची नोंद करण्यात आली होती. याशिवाय ३५०० शेतकऱ्यांचे दोन हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले होते. या अनुषंगाने तहसील कार्यालयातर्फे पाठवण्यात आलेल्या अहवालात ५४ कोटी ३७ लाख १४ हजार रुपये नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित होते. त्यापैकी तालुक्याला पहिल्या हप्त्यासाठी १८ कोटी १२ लाख ३७ हजार ६११ रुपये मंजूर झाले असून त्यापैकी १४ कोटी ४९ लाख ९० हजार ८८ रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. काही दिवसांत मंडळनिहाय याद्या जिल्हा मध्यवर्ती बँकेला पाठवण्यात येईल.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, तालुकानिहाय निधी वाटप...

बातम्या आणखी आहेत...