आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी खाल्ली मुन्ना मामांची चिक्की

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- माणूस कितीही मोठा झाला तरी बालपणीच्या आठवणी आल्या की तो भावुक होतो. शाळा हा तर सगळ्यांचाच वीक पाॅइंट. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिग्गे यांनी मंगळवारची सकाळ आपल्या शाळेत घालवली. एवढेच नव्हे तर शाळेसमोरच्या खाऊच्या दुकानाला भेट देऊन त्यांनी तेथील चिक्कीचाही आनंद घेतला. निमित्त होते केशवराज शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमाचे.   


मूळचे लातूर येथील रहिवासी असलेले शिवकुमार डिग्गे सध्या राज्याचे धर्मादाय आयुक्त आहेत. काही दिवसांसाठी सुटीवर असलेल्या डिग्गे यांना लातूर येथील केशवराज विद्यालयाने मंगळवारी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले होते. डिग्गे यांनी या कार्यक्रमात आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. त्यावेळेसचे शाळेतील वातावरण, शिक्षकांची शिस्त याच्या आठवणी जागवत त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचा कानमंत्र दिला. कार्यक्रमानंतर त्यांनी शाळेची पाहणी केली. बाहेर पडल्यानंतर त्यांना शाळेच्या मैदानासमोरचे मुन्ना मामांचे दुकान दिसले. केशवराज शाळेतील प्रत्येक आजी-माजी विद्यार्थ्यांसाठी मुन्ना मामांचे दुकान म्हणजे जणू पर्वणीच. मधल्या सुटीत खिशातला रुपया दोन रुपये खर्च करून कधी चिक्की, संत्रा गोळ्या, पेपरमिंटच्या गोळ्या मित्रांसोबत खायच्या हा मागील पिढीचा शिरस्ता होता. त्याची आठवण करीत धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिग्गेंची पावले त्यांच्या आठवणीतल्या मुन्ना मामांच्या दुकानाकडे वळली. आपल्या पदाचा रूबाब बाजूला ठेवून बाकड्यावरच बैठक मारली. मामांनी आवडती भेळ खाण्याचा आग्रह केला. 

बातम्या आणखी आहेत...