आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना : शेतकरी पिक विमा भरणा करण्यापासून वंचित, ..या आहेत अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी - राज्यात खरीप हंगामातील पीक विमा भरण्यासाठी 1 ते 24 जुलै पर्यंत कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मात्र अद्याप जालना जिल्ह्यातील दहा टक्के देखील शेतकऱ्यांचा विमा भरणा होऊ शकलेला नाही. जिल्ह्यातील CSC चालक विमा भरण्यासाठी रात्रभर जागून काम करण्याची तयारी दाखवतात. परंतु वेबसाईटवर वारंवार लोड वाढत असून विमा भरला जात नाही. म्हणून CSC चालक त्रस्त झाले आहेत. एक-एका CSC सेंटरकडे सुमारे एक हजार फॉर्म पडून आहेत. शिवाय दिवसभर शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तरे देऊन CSC चालकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.


वेबसाईटवर येणाऱ्या समस्या :  
1) फॉर्म भरला जातो मात्र पावती कोरीच निघते.
2) आधार कार्ड मॅच न होणे. 
3) आधार कार्ड पाच वेळा रजिस्टर आहे यापेक्षा जास्त वेळ स्वीकारले जाणार नाही असे एरर दाखवले जाते.


...यामुळे नवीन फॉर्म घेण्यास CSC चालकांनी केले बंद 
शिवाय वेबसाईट सुरू झाली तरीही एका फॉर्मला सुमारे दोन तास वेळ वाया जातो. यामुळे एका रात्रीत 10 शेतकऱ्यांचा विमा देखील भरला जात नाही.
जे फॉर्म CSC चालकांकडे जमा आहेत तेच फॉर्म भरले नाही गेले तर काय होईल. हा प्रश्न CSC चालकांसमोर उभा आहे. यामुळे नवीन फॉर्म घेण्यास CSC चालकांनी बंद केले आहे. शेतकऱ्यांची सुद्धा फरफट वाढली आहे. दिवसभर मानसिक तापाला कंटाळलेला CSC चालक रात्रभर वेबसाईटच्या तापाला कंटाळला आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...