आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलचलित शेती अवजार निर्मितीवर भर द्यावा; डॉ. बी. एस. प्रकाश यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- शेतीसाठी उपयुक्त जनावरांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. भारतीय शेतकऱ्यांची सरासरी जमीन धारण क्षमता केवळ १.१५ हेक्टर असून ४५ टक्के शेतकऱ्यांकडे ०.६ हेक्टर पेक्षा कमी जमीन वहितीखाली आहे. या शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यावर आपणास भर द्यावा लागेल. या शेतकऱ्यांना शेतमजुरी परवडत नाही तर दुसऱ्या बाजूस शेतीचे यांत्रिकीकरणही करता येत नाही. तेव्हा या शेतकऱ्यांसाठी किफायतशीर व उपयुक्त बैलचलित शेती अवजार निर्मितीवर भर द्यावा लागेल, असे प्रतिपादन भारतीय कृषी संशोधन परिषदेचे सहसंचालक (पशू विज्ञान) डॉ बी.एस.प्रकाश यांनी मंगळवारी (दि.३०) येथे केले.  


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्पातील पशुशक्तीचा योग्य वापर योजनेच्या राष्ट्रीय पातळीवरील वार्षिक दोनदिवसीय कार्यशाळेच्या उद‌्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी.व्यंकटेश्वरलू होते. संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, भोपाळ येथील डॉ. एम. दिन, गंगटोक येथील डॉ. एस. के. राऊतरे, डॉ. के. एन. अग्रवाल, अभियंता प्रा. स्मिता सोलंकी आदींची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. बी.एस.प्रकाश म्हणाले, राज्यातील अल्पभूधारक शेतकरी आजही शेतकामासाठी पशुशक्तीवरच अवलंबून आहेत. महाराष्ट्रातील देवणी व लाल कंधारी जाती हवामान बदलात तग धरणाऱ्या असून या पशुशक्तीचा वापर शेतीत कार्यक्षमरीत्या करता येईल.  प्रास्ताविक संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, सूत्रसंचालन डॉ. निता गायकवाड यांनी   तर आभार प्रा. स्मिता सोलंकी यांनी मानले. कार्यशाळेसाठी  कर्नाटक, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, ओरिसा, प. बंगाल, मध्य प्रदेश, नागालंॅड आदी राज्यातील ९ केंद्रांचे ३० शास्त्रज्ञ  सहभागी झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...