आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 50 जागा रद्द होणार नाहीत, अधिष्‍ठाता डाॅ. पोवार यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जानेवारी महिन्यात झालेल्या एमसीआयच्या वार्षिक तपासणी झाली होती. त्यावेळी बांधकाम, प्राध्यापकांच्या रिक्त जागा, वैद्यकीय अधीक्षकाची रिक्त जागा होती. त्यामुळे गेल्यावर्षी मिळालेल्या वाढीव ५० जागा  रद्द होण्याची नामुष्की ओढवली आहे.

 

परंतु शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन या त्रुटींची पूर्तता करीत असून कोणत्याही परीस्थितीत या जागा रद्द होणार नाहीत, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा दावा महाविद्यालयाचे अधिष्ठाता डाॅ.राजाराम पोवार यांनी केला आहे.   


पोवार यांनी सांगितले की त्रुटींची पूर्तता करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी आहे. या महिनाभरात आवश्यक तेवढे बांधकाम करून घेण्याची प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करून घेतली जात आहे. वैद्यकीय अधीक्षक आणि प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरल्या आहेत. त्याचा अहवाल तयार करून तो एमसीआयला पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
त्यामुळे लातूरच्या महाविद्यालयाच्या जागा रद्द झाल्या अशी पसरलेली माहिती चुकीची आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, याप्रकरणी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी विधिमंडळात हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर सूत्रे वेगाने हलली आणि कार्यवाही झाल्याचे कळते.

बातम्या आणखी आहेत...