आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ वादातून पत्नीकडून पतीचा चाकूने भोसकून खून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने आपल्या पतीच्या छातीत चाकू खुपसून त्याचा खून केल्याची घटना शनिवारी नागसेननगर भागात घडली. पोलिसांनी आरोपी पत्नीस घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले.   


शहरातील नागसेननगर भागात राहणाऱ्या पूनम श्याम ऊर्फ शिवाजी सरपाते (२०) या युवतीचे लग्न सहा महिन्यांपूर्वी श्याम ऊर्फ शिवाजी नारायण सरपाते (२४) याच्यासोबत झाले होते. शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास पूनमने घरातील भांडणाच्या कारणावरून घरातील चाकू घेऊन नवऱ्याच्या छातीत जोरदार वार केला. ही जखम त्याच्या वर्मी लागली व तो खाली पडला. तेथेच त्याचा मृत्यू झाला. शहर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक अभिजित फस्के, शिवाजीनगरचे पोलिस  निरीक्षक साहेबराव नरवाडे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन खून करणाऱ्या पूनम सरपातेला ताब्यात घेतले आहे.  शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपी महिलेवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

बातम्या आणखी आहेत...