आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरला जाताय.. मग येरमाळा, येडशी-मुरूडमार्गे जा, आदळआपट, गैरसोय टळेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- औरंगाबादहून लातूरला जाणाऱ्या वाहनधारकांना केज अंबाजोगाई मार्गावर सध्या अडथळ्यांची शर्यत पार करून सात ते साडेसात तासांत पाेहोचावे लागत अाहे. त्यातच या मार्गावर  नगर- अहमदपूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असल्याने अाणखी भर पडली आहे. या महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी तब्बल  दीड वर्ष लागणार असल्याने  वाहनचालकांना मनस्ताप सोसावा लागत आहे. औरंगाबादहून लातूरला जाणाऱ्यांनी बीडहून  मांजरसुंबा येरमाळा- येडशी - मुरूड मार्गे   गेल्यास ३६ कि.मी. अंतर वाढेल. पण  लातूरला वेळेत आणि विना मनस्ताप पोहोचाल हे मात्र नक्की. 


बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या अहमदनगर ते अहमदपूर या २७० कि.मी. च्या राष्ट्रीय महामार्गाचे सध्या काम सुरू आहे.  औरंगाबादहून लातूरला जाणाऱ्या  वाहन चालकांसाठी बीड, मांजरसुंबा अंबाजोगाईमार्गे  लातूरला जाताना खडतर रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. गावातून चार पदरी आणि गावाच्या बाहेरून  तीन  पदरी राष्ट्रीय  महामार्ग जाणार असून हे काम सध्या एमएसआरडीसीने तुकडे पाडून वेगवेगळ्या एजन्सीजला दिलेले आहे. १६५ कोटी रुपये खर्चाचे  राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होण्यासाठी दीड वर्ष लागणार आहे. सध्या पाटोदा तालुक्यातील चुंभळी ते पाटोदा , मंगेवाडी ते मुळूकपर्यंत कच्चे काम करण्यात आले आहे.  या मार्गावर जवळपास १५ पूल असणार आहेत. पुढे मांजरसुंबा गावापासून नेकनूरपर्यंत याच मार्गाचे काम सुरू  आहे. औरंगाबादहून बीड, मांजरसुंबा ,केज, अंबाजोगाईमार्गे लातूर हे अंतर २६६ किमी असून या मार्गे  लातूरला जाण्यासाठी   एरवी ६ तास २३ मिनिटे लागत असली तरी सध्या  खडतर रस्त्यामुळे तब्बल आठ तास लागत  अाहेत.  केज ते लोखंडी सावरगाव  ३५ किमी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे  पडले आहेत.  नवीन रस्त्याचे  कच्चे कामही सुरू आहे. याच मार्गावरील लोखंडी सावरगाव ते अंबाजोगाई हा मार्ग  थोडा बरा अाहे. विशेष म्हणजे   सार्वजनिक बांधकाम मंत्री  चंद्रकांत पाटील यांनी तेरा दिवसांच्या दिलेल्या मुदतीत याच मार्गावरील  खड्डे अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने बुजवल्याने  या विभागाला चांगल्या पद्धतीने खड्डे बुजवल्याने सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.परंतु याच मार्गावरील दुसऱ्या हद्दीतील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचे काय, असा सवाल वाहनधारक करत आहेत.

 

३६ किमीचा फेरा, पण पर्याय चांगला
औरंगाबाद - गेवराई- बीड- केज- अंबाजोगाईमार्गे लातूर हे अंतर २६६ किमी असून या प्रवासासाठी ६ तास २३  मिनिटे लागतात . परंतु नगर- अहमदपूर  महामार्गाचे काम सुरू असल्याने वाहनधारकांचे हाल होत आहेत.    वाहनधारकांनी जर औरंगाबाद -बीड- मांजरसुंबा- येरमाळा- येडशी- ढोकी- मुरूड- लातूर या २८० कि.मी.  वरून लातूर गाठले तर  सात तास लागतात. फक्त ३६ किमीचा फेरा  पडतो. 

 

तेवढ्याच अंतरात आणखी एक दुसरा मार्ग
औरंगाबादहून लातूरला जाणाऱ्या वाहनधारकांना बीडमार्गे आणखी एक मार्ग आहे. वडवणी- धारूर- आडस- सनगाव बर्दापूरमार्गे लातूरला जाता येते. हा मार्ग २६०  कि.मी.चा असून त्यासाठी ६ तास ४० मिनिटे लागतात.

बातम्या आणखी आहेत...