आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शादीखान्यावरून पुन्हा राजकारण;पालिकेच्या नोटिसीला पंकजांच्या मध्यस्थीने स्थगिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- परळीत नेहमीच या ना त्या कारणाने होणारी शह- काटशहाचे राजकारण पुन्हा एकदा दिसून आले आहे. मुंडे बंधू-भगिनींच्या या राजकारणामुळे परळी मात्र सातत्याने चर्चेत असते आता निमित्त मिळाले आहे ते परळीतील शादीखान्याचे! धनंजय मुंडे यांच्या ताब्यातील  परळी नगर पालिकेने शादीखाना चालवणाऱ्या संस्थेला नोटीस काढताच पंकजांच्या मध्यस्थीने नगरविकास मंत्र्यांनी या नोटिसीला स्थगिती दिली. त्यामुळे पुढील काही दिवस या मुद्द्यावर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडतील.     


परळीतील  पेठ मोहल्ला भागातील नगर परिषदेचे शहीद अब्दुल हमीद सांस्कृतिक सभागृह सन २००१ पासून ब्रिगेडियर शहीद अब्दुल हमीद सेवाभावी संस्थेकडे भाडेतत्त्वावर आहे.  अल्पसंख्याक समाजाचे सामुदायिक व सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातात. संस्थेने आतापर्यंतचे सर्व भाडे पालिकेला अदा केले आहे.   यावर्षीच्या वार्षिक कराराची मुदतही मार्च २०१८ रोजी संपत आहे,  दरम्यान, मुदत संपण्याच्या पूर्वीच नगर परिषदेने शहीद अब्दुल हमीद सेवाभावी संस्थेला नोटीस पाठवून सभागृहाचा ताबा देण्यास सांगितले होते.   

 

 स्थगिती   
पालिकेच्या नोटिशीला स्थगिती मिळावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष ताजखान पठाण, सचिव जावेदराज, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम जहांगीर यांच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात पालकमंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेतली व नोटिशीला स्थगिती देण्याची मागणी केली. मुंडे यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्याशी  संपर्क साधून या  नोटिशीला स्थगिती मिळवून दिली.    

बातम्या आणखी आहेत...