आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांचा लढा पुरुषांशी नव्हे, असमानतेशी- खा. सुळे; बीडमध्ये लेखिका संमेलनास प्रारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डाॅ. बाबासाहेब अांबेडकर हे पुरुषच हाेते. त्यांनीच स्त्रियांना पाठबळ देऊन समानतेने जगण्याचा अधिकार, विचार दिला अाहे. महिलांची लढाई  पुरुषांशी नव्हे, असमानतेच्या विचारांशी अाहे,  असे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या. ८ व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनास शनिवारी बीडमध्ये यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सुरुवात झाली. मशाल  पेटवून  महापुरुषांच्या प्रतिमा पूजनाने संमेलनाचे उद््घाटन झाले. 

 

बीडमध्ये लेखिका संमेलनास प्रारंभ
शनिवारी सकाळी नऊ वाजता ग्रंथपूजन करून ग्रंथदिंडीला सुरुवात झाली. प्रमुख मार्गावरून निघालेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी महापुरुषांच्या वेशभूषा साकारल्या हाेत्या. ग्रंथदिंडीच्या रथात मावळत्या अध्यक्षा डॉ.वृषाली किन्हाळकर, संमेलनाध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर, स्वागताध्यक्ष उषा दराडे विराजमान होत्या.

बातम्या आणखी आहेत...