आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव म्हणाले, सौख्यभरे नांदा, सुखाचा संसार करा! 111 नवदांपत्यांना दिले उद्धव ठाकरेंनी शुभाशीर्वाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा- जयवंतराव सावंत प्रतिष्ठानच्या वतीने उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर वर्क्सच्या प्रांगणावर रविवारी (दि.१८) दुपारी आयोजित १८ व्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यात १११ नवदांपत्यांनी लग्नगाठ बांधली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लग्न सोहळ्याला उपस्थिती लावून नवदांपत्यांना ‘वैवाहिक जीवनातील जबाबदारी पार पाडून सौख्यभरे नांदा, सुखी संसार करा’, असा शुभाशीर्वाद दिला. 


उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सावंत परिवाराने आयोजित केलेला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा नवदांपत्यांना दिलासा देणारा आहे. समाजऋण फेडणे व सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा हा योग्य प्रयत्न आहे. यापुढेही असेच विवाह सोहळे आयोजित करून शेतकरी कुटुंबांना आधार द्यावा. या विवाह सोहळ्यात आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचे सुपुत्र गिरीराज यांचा विवाह पुणे येथील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची पुतणी राजेश्वरी यांच्यासोबत झाला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव सावंत यांचे सुपुत्र पृथ्वीराज यांचा विवाह वाईचे महेश तरडे-पाटील यांची कन्या शरयू हिच्यासोबत झाला. सोहळ्याला उद्धव ठाकरे यांच्यासहीत पालकमंत्री अर्जुन खोतकर, सहपालकमंत्री महादेव जानकर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. शिवाजी सावंत, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आमदार मधुकर चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल खोचरे, माजी आमदार ओमराजे निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

 

सेलिब्रिटींनी  दिल्या शुभेच्छा
विवाह सोहळ्याला झी टीव्हीवरील ‘लागीर झालं जी’ मालिकेतील नितीश चव्हाण, शिवाणी बोरकर यांच्यासह ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील शशांक केतकर, पूजा सावंत, नेहा पेंडसे आदींनी नवदांपत्यांना शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...