आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन दिवसांचा पाणीपुरवठा नियमित होण्यास ८ दिवस; अधिकाऱ्यांकडून नियोजन सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मनपाकडून शनिवारपासून शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू झाला. मात्र, नियमितपणे दोन दिवसांआड पाणी देणे शक्य अाहे किंवा नाही याचे उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही. सध्या सुरु असलेला पाणीपुरवठा नियमित होण्यासाठी मनपाला आठ दिवसांचा अवधी लागणार असून अधिकाऱ्यांकडून तसे नियोजन करण्यात येत आहे. 


शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांआड करण्यात आला तरी नेमके कोणत्या भागात दोन दिवसांआड पाणी मिळणार याचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आले नाही. सोमवारी नागरिकांना याची माहिती मिळण्याची शक्यता आहे. नियमित आणि मुबलक शुद्ध पाणीपुरवठा करण्यात यावा, इतकी नागरिकांची मागणी आहे. प्रारंभी प्रायोगिक तत्त्वावर पाणीपुरवठा सुरू असून येत्या आठ दिवसांत ज्या भागात पाणीपुरवठा होईल, त्या भागाची परिस्थिती पाहून येणाऱ्या अडचणी दूर केल्या जातील. 


१०० एमएलडी पाणी वाढवण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक : शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने आहे त्याच जुन्या यंत्रणेत सुधारणा करून किमान शंभर एमएलडी पाणी वाढवण्याचे ठरवले आहे. यासाठी तज्ज्ञ अधिकारी नेमण्याचे आयुक्तांनी ठरवले आहे. त्यासाठी इच्छुकांकडून ऑनलाइन प्रस्ताव मागवण्यात आले आहे. 


सध्या प्रयोगच 
मुबलक पाणी देण्यासाठी मनपाकडून अद्याप नियोजन करण्यात आले नाही. आहे त्या पाण्याच्या वेळात कपात करून काही भागांत पाच दिवसांआड तर काही भागांत चार दिवसांआड पाणी देण्यात येत आहे. 


यशस्वितेवर शंका 
मनपाने आतापर्यंत तीन वेळा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र यात यश न आल्याने सध्या बदलण्यात आलेल्या वेळापत्रकावर शंका उपस्थित होत आहे.

बातम्या आणखी आहेत...