आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : पुराच्या पाण्यातून पुल पार करण्याचा प्रयत्न अंगलट, वृद्धाचा वाहून गेल्याने मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- शिरुर अनंतपाळ तालुक्यातील नागेवाडीत पुराच्या पाण्यातून पुल पार करणा-या एक वृद्धाचा लोकांदेखत वाहू गेल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. वृद्ध पुल पार करताना पुलाच्या दोन्ही बाजूला शेकडो लोक जमले होते पण तेही पाण्याच्या प्रवाहापुढे हतबल झाले. त्यांच्या देखत वृद्ध वाहून गेला. हा सगळा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईल कॅमे-यात कैद केला. 

 

लातूर जिल्ह्यात शनिवार दुपारपासून मुसळधार पाऊस पडत आहे. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील घरणी नदीला महापूर आला आहे. नागेवाडीतील पुलावरुन हे पुराचे पाणी वाहत होते. याच पाण्यातून एका वृद्धाने पुल पार करण्याचा प्रयत्न केला. काठावर उभ्या असलेल्या लोकांना त्याला पाण्यात न उतरण्याचा सल्ला दिला पण तो न एेकताच वृद्ध पुढे सरकू लागला. निम्मे अंतर कापल्यानंतर पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्याचा तोल गेला आणि तो प्रवाहाने वाहत गेला. पाणी जास्त असल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. हा सगळा प्रकार लोकांच्या डोळ्यांदेखत घडलापाण्याचा  प्रवाह जास्त असल्याने तेही हतबल झाले. वृद्ध वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. पुराच्या पाण्यात वाहून जाण्याची या पावसाळ्यातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. 

 

पुढील स्लाईडवर पहा घटनेचे फोटो

बातम्या आणखी आहेत...