आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसाने सात दिवसांपूर्वी डोक्यात काठी घातलेल्या वृद्धाचा रुग्णालयात मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - निलंगा बसस्थानकात दुपारी झोपलेल्या एका वृद्धाच्या डोक्यात पोलिसाने सात दिवसांपूर्वी काठी मारली होती. त्या जखमी वृद्धावर उपचार सुरू असताना सोमवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. मंगळवारी त्याचे प्रेत निलंग्यात आणले असता पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय प्रेत ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा वृद्धाच्या नातेवाइकांनी घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला होता.    


पांडुरंग बिरादार (रा. चिंचोली, ता. निलंगा) हे निलंगा येथील बसस्थानकात ७ मार्च रोजी झोपले होते. तेथे गस्तीवर असलेले पोलिस जमादार कोळी (पूर्ण नाव उपलब्ध नाही) यांनी त्या वृद्धाच्या डोक्यात काठीने मारहाण करून त्याला तेथून उठून जाण्यास सांगितले. यामुळे ते वृद्ध झोपेतून उठले, परंतु काठीचा डोक्यावर बसलेला मार त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे ते उठताच कोसळले. त्यांना तेथील शासकीय रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. गेले सहा दिवस त्यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. सोमवारी रात्री साडे अकरा वाजता त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी त्यांचे प्रेत निलंग्यात नेण्यात आले. परंतु वृद्धाला मारहाण करून त्यांच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलिस जमादार कोळी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी वृद्धाच्या नातेवाइकांनी लावून धरली. मंगळवारचा अख्खा दिवस प्रेत असलेली गाडी उभी होती. पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांच्यापर्यंत हा प्रकार पोहोचल्यानंतर चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी उपाधीक्षक गोपाळ रांजणकर यांना दिले.

बातम्या आणखी आहेत...