आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृद्धाच्या आत्महत्येप्रकरणी सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - तालुक्यातील आसेगाव येथील एका (७०) वर्षीय वृद्धाने प्रशासन जमीन मोजणी करून देण्यासाठी दिरंगाई करीत असल्याने कंटाळून शहरातील न्यायालय परिसरात विष प्राशन केल्याची घटना सोमवार दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली होती.यात त्या वृद्धाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मंगळवारी जिंतूर पोलिस ठाण्यात या वृद्धाच्या दोन सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल झाला आहे.


आसेगाव येथे राहणाऱ्या(७०) वर्षीय तुकाराम जव्हार या वृद्ध शेतकऱ्याने शासन दरबारी जमिनीची मोजणी करून द्यावी अशी याचना वारंवार केल्यानंतरही प्रशासन दखल घेत नसल्याने सदरील वृद्ध शेतकऱ्याने जिल्हाधिकारी व तहसीलदारांना ठराविक काळात जमीन मोजून न दिल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला होता. मात्र तरीही याची कोणतीही दखल न घेतल्यामुळे सोमवार १२ मार्च रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास जव्हार यांनी न्यायालय परिसरात विष प्राशन केल्याचे लोकांच्या निदर्शनास आल्यानंतर काही नागरिकांनी त्यांना तत्काळ शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती गंभीर असल्याने त्यांना परभणी येथे हलवण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. रात्री उशिरापर्यंत उत्तरीय तपासणीचे काम चालू होते.

 

याप्रकरणी मंगळवारी दुपारनंतर जिंतूर पोलिस ठाण्यात रंगनाथ जव्हार यांच्या फिर्यादीवरून सखाराम किसन जव्हार व नामदेव किसन जव्हार या दोन सख्ख्या भावांविरूद्ध संगनमताने आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.  

बातम्या आणखी आहेत...