आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहितेशी प्रेमसंबंधातून दोघांत वाद, 'तिने' मध्यस्थी केली, मात्र दोघेही हटेनात, अखेर एकाचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- प्रेमसंबंधातून दोघांमध्ये झालेल्या जबर हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना २१ जून रोजी शहरातील सिटीझन कॉर्नर येथे घडली होती. या प्रकरणाने आता वेगळीच कलाटणी घेतली असून पोलिसांनी कॉल रेकॉर्ड, मोबाइल ट्रेसवरून प्रेमाच्या त्रिकोणातील 'नाट्य' समोर आणले. यात मृत व आरोपी हे दोघे विवाहित महिलेच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. मृताने तर त्याच्या उजव्या हातावर विवाहित प्रेयसीचे नावही गोंदले होते. यामुळे आरोपी, मृतात दूरध्वनीवरून बाचाबाची झाली होती. हा प्रकार संबंधित विवाहितेच्या लक्षात आल्यानंतर तिने हा वाद कायमस्वरूपी मिटवण्याचे सांगितल्याने हे दोघे भेटले. परंतु, वादावादी झाल्याने यात एकाचा खून झाला. 


मोनिका (बदललेले नाव) ही आपल्या नवऱ्यासोबत जालना शहरात वास्तव्यास आहे. दरम्यान, मृत कृष्णा सिरसाठ याचे या विवाहित मोनिकाशी अनेक दिवसांपासून सूत जुळलेले होते. विवाहितेच्या पतीच्या ओळखीतून आरोपी शोएब चाऊसचेही या महिलेशी सूत जुळले. या दोघांनाही त्यांचे प्रेम खटकत राहायचे. दरम्यान, शोएब हा विवाहितेच्या एक दिवस घरी असताना कृष्णाचा फोन आला. शोएबने हा नंबर मोबाइलमध्ये डायल करून नंतर तू तिला भेटू नको, असे सांगून धमकी दिली. यातून दोघांत बाचाबाची झाली. या दोघांतील वाद विवाहितेच्या लक्षात आल्यानंतर हा वाद समक्ष भेटून कायमस्वरूपी मिटवावा, यासाठी तिने पुढाकार घेऊन भेटण्यास सांगितले. त्यानुसार मृत कृष्णा सिरसाठ व त्याचा चुलत भाऊ बाळासाहेब सिरसाठ हे भेटण्यासाठी विशाल कॉर्नर येथे आले होते. परंतु, बाचाबाची, द्वेषातून दोघांवर शोएब व त्याच्या मित्राने धारदार शस्त्राने मारहाण केली. यात दोघेही गंभीर जखमी झाले होते. दुसऱ्या दिवशी कृष्णाचा मृत्यू झाला. 

 

मृताच्या उजव्या हातावर गोंदण 
मृत कृष्णाचे गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित विवाहितेशी प्रेमसंबंध जुळलेले होते. त्याने स्वत:च्या हातावर त्या महिलेसह त्याचे नाव गोंदले होते. ही माहिती रेकॉर्डमध्ये घेतली. -सी. जी. गिरासे, पीएसआय, चंदनझिरा पोलिस ठाणे, जालना. 


दोषारोपपत्राची प्रक्रिया 
न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यासाठी पुरावे गोळा केले जात आहेत. आरोपींच्या ताब्यातून हत्यारे जप्त केली आहेत. 
-बाळासाहेब पवार, पोलिस निरीक्षक, चंदनझिरा पोलिस ठाणे, जालना. 


या प्रकरणामध्ये असा घडला घटनाक्रम 
- २० जून रोजी ९.३० वाजता घडली घटना. 
- २१ जून रोजी दुपारी १.३० वाजता जखमी मृत. 
- २२ जून रोजी घटनास्थळावरून हत्यार जप्त केले. 


असा केला रेकॉर्ड 
घटनेनंतर पोलिसांनी दोनच तासांत आरोपींना ताब्यात घेतले. यानंतर मोबाइल ट्रेस, कॉल रेकॉर्डिंगवरून सर्व माहिती संकलित केली. त्यानंतर संबंधित विवाहिता व तिच्या पतीशी चर्चा केली. या चर्चेतून प्रेमाचा त्रिकोण समोर आला. वाद होऊ नये म्हणून सामंजस्य घेत महिलेने हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न केला. अर्वाच्य संभाषाणामुळे ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...