आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत व्याजाच्या वसुलीवरून एकाचा खून; दोघांवर गुन्हा दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - पाच हजारांच्या व्याज व्यवहाराच्या रकमेच्या वसुलीवरून चौघांनी तलवार व पिस्टलचा धाक दाखवून एकाचे अपहरण करीत शस्त्राने वार करून जिवे मारले. मारल्यानंतर मृतदेह दवाखान्यात आणून टाकल्याचा प्रकार शुक्रवारी घडला. चौघांविरुद्ध नानलपेठ ठाण्यात गुन्हा दाखल झाला. शेख अल्ताफ असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. 

  
जवाहर कॉलनी येथील मजुरी व गवंडीकाम करणारे तिघे भाऊ आई-वडिलांसह एकत्रित राहतात. शेख अल्ताफ (३५), शेख एजाज (३१), शेख असलम(२८) हे तिघे दिवसभराचे काम आटोपून बुधवारी घरी आले होते. रात्री दहाच्या सुमारास ते झोपल्यानंतर शुक्रवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांच्या घराच्या दरवाजावर थाप मारल्याचा आवाज आल्याने शेख एजाज यांनी दरवाजा उघडला. तेव्हा त्यांच्याच मोहल्लातील सलीम फारुखी, सलाउद्दीन फारुखी, तब्बन फारुखी व अन्य एक जण असल्याचे निदर्शनास आले. सलाउद्दीन याने मोठा भाऊ शेख अल्ताफ कोठे आहे असे विचारले.

 

या वेळी शेख अल्ताफ घराबाहेर आला. सलाउद्दीनने त्याच्याकडे ५ हजारांची मागणी करीत त्याचे हात पकडले. घरातील मंडळींनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली असता तब्बन फारुखी याने शेख एजाजच्या डोक्याला पिस्टल लावून धमकी दिली, तर सलाउद्दीनने तलवारीचा धाक दाखवून शेख अल्ताफ याला उचलून नेले.

बातम्या आणखी आहेत...