आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवशाही बसला अपघात, पुलाच्या कठड्याला अडकल्याने अनर्थ टळला, एक प्रवासी गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- मुरुडजवळ ड्रायवरचे नियंत्रण सुटल्याने शिवशाही बसला अपघात झाला. बस पुलाच्या कठड्याला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात एक प्रवाशी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही दुर्घटना रविवार पहाटे पाच वाजता घडली. 

 

मिळालेल्या माहितीनुसार पहाटे पाच वाजण्याच्या सुमारा कोल्हापूर-नांदेड (एमएच 03 सीपी4544)या शिवशाही बस चालकाचा ताबा सुटल्याने बस मुरूडजवळ पुलाच्या कठड्यावर चढली. बस काही फूट पुढे गेली व पुलावर कठड्यावर लटकली. त्याचवेळी दारात उभा असलेले प्रवासी राजेश गणपत देवसरकर (रा.देवसरी ता.उमरखेड जि. यवतमाळ हा. मु. पंढरपूर(लाईनमन) हे बाहेर फेकले गेले.  त्यांच्यावर लातूरच्या शासकीय रूग्णालयात उपचार केल्यानंतर त्यास सह्याद्री या खासगी रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात अाले अाहे. बसमध्ये तेरा प्रवासी होते. अपघातावेळी अडकलेल्या प्रवाशांना उजव्या बाजूच्या दारातून काढण्यात अाले. ड्रायव्हर कामाजी पवार हा एक महिन्यापूर्वीच या बससेवेत दाखल झाल्याचे सांगण्यात आले. शिवशाहीला बसेसचा वारंवार अपघात होत असल्याने प्रवाशांमध्ये भीती वाढली आहे. 

बातम्या आणखी आहेत...