आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद: दोन गटांत तुफान दगडफेक; चार जण जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद - शहरातील जुनी गल्ली भागात गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास दोन गटांत अचानक दगडफेक झाली. या घटनेमुळे  तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी या भागांत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. घटनेनंतर पोलिस अधीक्षक पंकज देशमुख ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले, मात्र उशिरापर्यंत परिस्थिती तणावपूर्ण होती.

 

दरम्यान       झेंडा लावण्याच्या कारणावरून ही दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. दगडफेकीत ४ जण जखमी झाले आहेत. त्यांची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाहीत.

 

बातम्या आणखी आहेत...