आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृतांच्या वारसांना 6 लाखांची मदत, मुुंडे भगिनींकडून सांत्वन; वैद्यनाथ साखर कारखाना बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील उसाच्या उष्ण रसाची टाकी फुटून बारा कामगार गंभीर जखमी झाले होते. यापैकी पाच जणांचा शनिवारी उपचारादरम्यान लातुर येथे मृत्यू झाला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे आणि कारखान्याच्या संचालिका अॅड. यशश्री मुंडे या मुुंडे भगिनींनी शनिवारी लातूरमध्ये जखमींची रुग्णालयात जाऊन भेट घेत धीर दिला. मृतांच्या वारसांना सहा लाख रुपये तर जखमींना दीड लाख रुपये मदत देण्यात येणार आहे.

 

दरम्यान, चार जणांच्या मृ़त्यूने परळी तालुक्यात शोककळा पसरली असून विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे रविवारी सकाळी कारखान्यावर भेट देऊन पाहणी करणार आहेत. दोन दिवसांपासून वैद्यनाथ सहकारी कारखाना बंद आहे.

 

पांगरी येथील वैद्यनाथ कारखान्यातील ऊसाच्या उष्ण रसाची टाकी फुटून जखमी झालेल्या बारा कामगारांपैकी सुभाष कराड, मधुकर आदनाक, गौतम घुमरे सुनिल भंडारे या चार कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृ़त्यू झाला. तर अन्य जखमींवर लातूर येथील डाॅ. विठ्ठल लहाने यांच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंडे भगिनींनी लातूरमध्ये जखमींची भेट घेत विचारपूस केली, कारखाना प्रशासन मुंडे परिवार सोबत असल्याचा धीर त्यांनी यावेळी त्यांना कुटुंबियाना दिला. मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना सहा लाख रुपये देण्यात येणार आहे.

 

दरम्यान,विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे रविवारी सकाळी पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर भेट देऊन पाहणी करणार असून जखमींची ते भेट घेऊन विचारपूस करणार आहेत.

 

हजार मेट्रिक टन ऊस पडून
याशुक्रवारच्या दूर्घटनेनंतर शनिवार पासून वैद्यनाथ कारखाना बंद आहे. दररोज चार हजार मेट्रीक टन ऊस गाळपाची क्षमता असलेला कारखाना दोन दिवसांपासून बंद असल्याने तोडलेला आणि गाड्यांमध्ये भरलेला जवळपास हजार मेट्रीक टनाहून अधिक ऊस पडून आहे.

 

साखर कारखाना म्हणजे आमचे खर...

परळी व परिसरातील शेतकऱ्यांच्या घरी सुबत्ता येण्यासाठी व भागात रोजगार उपलब्धतेसाठी लोकनेते गोपिनाथ मुंडे यांनी कारखान्याची वीट न वीट रचताना आम्ही पाहिले आहे.  साखर कारखाना म्हणजे आमचे घर आहे. ही घटना आमच्या घरी घडली ह्याच दुःख आहे. साहेबांच्या जाण्याचे दुःख डोंगरा एवढा होता त्या दुःखात तुम्ही भगिनी उभ्या राहिल्यात. तेच आम्ही डोळ्यासमोर ठेऊन खंबीरपणे उभ्या राहू, अशी प्रतिक्रिया जखमी माधव बाळासाहेब मुंडे यांच्या आईंनी दिली आहे.

 

मुंडे कुटुंबाकडून वैयक्तिक मदत...

जखमी व्यक्तींचा हॉस्पिटलमधील उपचाराचा पूर्ण खर्च मुंडे कुटूंब उचलणार आहे. त्याचप्रमाणे मुंडे कुटुंबाकडून जखमींच्या वैयक्तिक प्रत्येकी एक लाख रुपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून जखमींना प्रत्येकी पन्नास हजार व वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्या मार्फत प्रत्येकी पंचवीस हजार देण्याचे जाहीर केले.

 

दरम्यान, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात उसाचा रस गरम करण्याच्या टाकीची गळती बंद करण्यासाठी वेल्डिंग करत असतानाच टाकीला मोठे छिद्र पडून टाकी फुटली. काल (शुक्रवारी) दुपारी 3 वाजेच्या सुमारात झालेल्या घटनेत 11 कर्मचारी भाजले होते. यापैकी 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सहा जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...