आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येत्या 4 दिवसांत परभणीचे तापमान 44 वर पोहोचणार, राज्‍यभरात उष्‍णतेची लाट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - अक्षय्य तृतीयेनंतर तापमानाचा पारा हळूहळू आग ओकू लागला असून ४१.५ अंश सेल्सियसवर तापमान पोहोचल्याने वाढत्या पाऱ्याने लाहीलाही होऊ लागली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने येत्या २५ तारखेपर्यंत तापमान ४३ ते ४४ अंश सेल्सियसदरम्यान राहील, असे म्हटले आहे. त्यामुळे उष्णतेची लाट आल्याचे दिसून येत आहे. 


विद्यापीठातील तापमानात व शहरातील तापमानात नेहमीच तफावत असते. याबाबतीत विद्यापीठातील शेतजमीन, झाडे, पाणी यामुळे थोड्याफार प्रमाणात तापमानात फरक असतो. ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राने शनिवारपासून २५ एप्रिलपर्यंत नोंदवल्या हवामान अंदाजात तापमान ४३ अंश सेल्सियस असल्याचे म्हटले आहे. या पाच दिवसांत तापमानाचा आलेख उंचावला जाणार असून बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात दि.२४ व २५ रोजी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.   

 

तापमानाच्या वाढत्या पाऱ्याने व त्यातच वीज कंपनीकडून सातत्याने होत असलेल्या खंडित पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शनिवारी सकाळी नऊ वाजल्यापासून सूर्य आग ओकण्यास सुरुवात झाली होती. 

बातम्या आणखी आहेत...