आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी: चापट मारली म्हणून 8 जणांचा तीन जणांवर तलवारीने हल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी -  जुन्या भांडणात चापट का मारली होतीस या कारणावरून  रात्रीच्या वेळी  घराकडे निघालेल्या तीन तरुणांवर आठ जणांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना परळी शहरातील सिद्धार्थनगर भागात बुधवारी रात्री अकरा वाजता  घडली.  


परळी येथील श्याम मुंडे आणि अनिल कांबळे, नंदू गायकवाड हे तरुण बुधवारी रात्री अकरा वाजता जेवणासाठी घराकडे निघाले होते. या वेळी संदीप ऊर्फ गोट्या रावसाहेब सोनवणे, सुदीप ऊर्फ पापा रावसाहेब सोनवणे, विशाल रावसाहेब सोनवणे, अनिल उत्तम सोनवणे, भय्या उत्तम सोनवणे, महादेव उत्तम सोनवणे, रावसाहेब शंकर सोनवणे आणि भय्या साहेब भानुदास गायकवाड हे आठ त्या ठिकाणी आले.  आठ जणांनी दोघांना विचारणा करत तू भैया भानुदास गायकवाड याला चापट का मारलीस?’ असा जाब  विचारला. तेव्हा वाद होऊन यातील अनिल कांबळे, श्याम मुंडे, नंदू गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. यात तिघेही गंभीर जखमी झाले. अनिल कांबळे यांच्या तक्रारीवरून ८ जणांवर  संभाजीनगर पोलिस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल झाला.

बातम्या आणखी आहेत...