आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - खरीप हंगामासाठी शेती व कृषी विभागाची लगबग सुरू झाली आहे. मशागतीचे कामे जोमाने पूर्ण केली जात आहे. मराठवाड्यात यंदा ५१.२१ लाख हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. हवामान संस्थांनी समाधानकरक मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे पेरणी क्षेत्र १०३ टक्के होण्याची अपेक्षा असून सर्वच पिकांच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे औरंगाबाद व लातूर कृषी विभागाने अहवालात नोंद घेतली आहे. नियोजित २६ एप्रिल रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय खरीप आढावा बैठकीत मराठवाडा पेरणी अहवाल सादर केले जाणार आहे.
यंदा भारतीय हवामान विभाग व स्कायमेट संस्थेने मान्सूनचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार केवळ ३ ते ५ टक्के सरासरी पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मे अखेर नैर्ऋत्य मान्सूनचे वेळेवर आगमन होणार असून मराठवाड्यात मृग नक्षत्रात पावसाचे आगमन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे यंदा पेरणी क्षेत्रात वाढ होणार असल्याचे कृषी विभागाने प्रस्तावित धरले आहे. त्या दृष्टीने गुढीपाडव्यापासूनच शेतकरी खरीप पेरणीच्या तयारीला लागले आहेत. शेती मशागतीचे कामे वेगाने पूर्ण करून घेतली जात आहेत. बाजारात बी-बियाणे व खते विक्रीसाठी येत आहेत. विशेष म्हणजे बोगस बियाणे, खत विक्रीचा सुळसुळाट झाला आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभाग व शासनापुढे मोठे आवाहन उभे ठाकले आहे.
आंतरबहुपीक
एका पिकाबरोबर दुसरे आंतर पीक घेण्यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी प्रशिक्षणातून माहिती दिली जात आहे. आपत्तीत होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना प्रभावीपणे राबवली जाणार आहे.
गतवर्षी शेतकऱ्यांनी उतरवलेला पीक विमा
राज्यात ८२.३० लाख त्यापैकी सर्वाधिक मराठवाड्यात ६४.३ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला.
पुढील स्लाइडवर पाहा, जिल्हानिहाय सरासरी खरीप पेरणी क्षेत्र...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.