आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांना महिलांची शेतात घेरून मारहाण; धारूर तालुक्यात चौकशीसाठी गेले होते पोलिस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- एका गुन्ह्यातील आरोपीच्या चौकशीसाठी गेलेल्या धारूरच्या पोलिस अधिकाऱ्यांना वस्तीवरील काही महिलांनी शेतात घेरून उसाने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात  एका पोलिस अधिकाऱ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना गावंदरा (ता. धारूर) येथे रविवारी सायंकाळी घडली. पाेलिसांनी ९ जणांिवरोधात शासकीय कामकाजात अडथळा तसेच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंद केला अाहे.  


गावंदरा येथील भाऊसाहेब भानुदास राठोड याच्यावर पिंपळनेरसह धारूरमध्ये काही गुन्हे नोंद आहेत.  त्याची चाैकशी करण्यासाठी धारूरचे सहायक पोलिस निरीक्षक एन. ई. केळे, पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे हे रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास काही पाेलिसांसह गावंदराजवळ असलेल्या राठोड वस्तीवर गेले होते. तेथे पाेलिसांना पाहून भाऊसाहेबने पळ काढला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पळता पळता पाय घसरून पडलेल्या भाऊसाहेबला पाेलिसांनी तातडीने पकडले. मात्र ‘भाऊसाहेबला का पकडले?’ असा जाब विचारत वस्तीवरील महिलांनी पोलिसांवरच हल्ला केला. उसाच्या टिपऱ्याने त्यांनी पोलिसांना मारहाण केली. तसेच पोलिसांच्या वाहनावरही  दगडफेक केली.  या हाणामारीत  पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत घोळवे यांच्या डोळ्याला गंभीर मार लागला आहे. त्यांच्यावर अंबाजाेगाईत उपचार सुरू आहेत. रात्री दहा वाजेपर्यंत पोलिस आणि महिलांमध्ये गोंधळ सुरू होता.      

 

अाराेपीने ठोकली धूम 
गाेंधळात अाराेपी भाऊसाहेबही पळून गेला. याप्रकरणी रात्री उशिरा  भाऊसाहेब राठोड, मधुकर भानुदास राठोड, विजय भाऊसाहेब राठोड, रावसाहेब वसंत राठोड, वसंत रुबा राठोड, यमुनाबाई राठोड, शारदा राठोड, कविता राठोड, वनिता राठोड यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...