आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नांदेडमध्ये पोलिस भरती रॅकेट; 20 जणांवर गुन्हे, प्रत्येकी 7.5 लाख रूपये घेतले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - नांदेड पोलिस दलात भरतीसाठी लेखी परीक्षेत फेरफार करून उत्तरपत्रिकाच बदलून जवळपास ९० गुण घेत नोकरी मिळवून देणाऱ्या रॅकेटचा बुधवारी पर्दाफाश करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल करून १२ जणांना अटक केली आहे. यात २ पोलिस काॅन्स्टेबलसह पुण्यातील एसएसजी सॉफ्टवेअर कंपनीतील दोघा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, या घोटाळ्यातील सूत्रधार अद्याप फरार असून आहे. तो पुण्याचा आहे, त्यालाही लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


नांदेड जिल्हा पोलिस दलात पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली. यादरम्यान, पेपर तपासणीचे काम पुणे येथील एसएसजी या सॉफ्टवेअर कंपनीला दिले होते. या प्रकरणाचा मास्टरमाइंड नामदेव बाबूराव ढाकणे (आयआरबी, पोलिस हेड कॉन्स्टेबल, औरंगाबाद) याने एसएसबी या पुण्यातील सॉफ्टवेअर कंपनीचे कर्मचारी शिरीष अवधूत, स्वप्निल दिलीप साळुंके व प्रवीण भटकर यांना हाताशी धरून पोलिसात भरती करून देतो, असे आमिष दाखवून मैदानी चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांकडून प्रत्येकी साडेसात लाख रुपये घेतले. यानंतर लेखी  परीक्षेच्या उत्तरपत्रिका उमेदवारांना कोऱ्या सोडायला लावून तेथे फेरफार करून अचूक उत्तरे लिहिली. याबरोबरच काही उमेदवरांच्या तर उत्तरपत्रिकाच बदलल्या. याप्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात २० जणांवर गुन्हा दाखल करून १२ जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये नामदेव ढाकणे, शुक्राचार्य बबन टेकाळे, एसएसजी कंपनीचे शिरीष अवधूत, स्वप्नील साळुंके यांच्यासह १२ जणांना अटक केली आहे. 


या २० आरोपींवर गुन्हा : नामदेव बाबूराव ढाकणे (पो. हेड काॅन्स्टेबल, औरंगाबाद), शुक्राचार्य बबन टेकाळे (पोलिस कॉन्स्टेबल, एसआरपीएफ, जालना), शेख आगा (रिसोड), शिरीष अवधूत, स्वप्नील साळुंके (एसएसजी सॉफ्टवेअर सांगली), प्रवीण भटकर (ओआरएम ऑपरेटर, पुणे), दिनेश गजभारे (नांदेड) यांच्यासह पोलिस भरतीतील उमेदवार ओंकार संजय गुरव (भुदरगड, कोल्हापूर), कृष्णा काशीनाथ जाधव कैलास काठोडे, आकाश दिलीप वाघमारे (तिघे रा. सावखेड भोई, ता. दे.राजा), सलीम मोहंमद शेख (तोंडगाव जि. वाशिम), समाधान सुखदेव मस्के, किरण अप्पा मस्के (दोघे रा. गिरवली ता. देऊळगाव राजा), सुमीत दिनकर शिंदे (येवती, ता. रिसोड), मुखीद मक्सूद अब्दूल (जिंतूर), हनुमान भिसाडे (रिसोड), रामदास भालेराव (कंधार), संतोष तनपुरे (नांदुरा, हिंगोली).

बातम्या आणखी आहेत...