आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमधील काका-पुतण्याच्या सत्तासंघर्षावर अजित पवारांचे मौन; धनंजय मुंडेंनी दिले काही संकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- भाजप सरकारच्या धोरणाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोलच्या माध्यमातुन राज्यात रान पेटवले असुन बुधवारी रात्री बीडच्या जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील क्षीरसागर काका पुतण्याच्या सत्तासंघर्षावर मौन बाळगले. तर सभा यशस्वी करून दाखवल्याबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुतणे संदीप यांचे अभिनंदन करत प्रमाणपत्र दिले. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धंनजय मुंडे यांनी सभेत काही जण आज  कनफ्युज असुन आपले ही आष्टी सारखे झाले तर ही भिती त्यांना सतावत आहे.असे सांगुन हल्लाबोल सभेला गैरहजर असलेल्या बीडच्या पक्षाच्याच आमदारास लक्ष केले. संदीप यांनी भाषणातच अजित पवार यांच्याकडे आर्शिवाद मागत आपण निवडणूक लढवून निवडून येऊ, असा विश्वास व्यक्त केल्याने बीडमध्ये आमदार काकांची  चांगलीच गोची झाली आहे.

 


बीडमध्ये क्षीरसागर कुटूंबातील काका-पुतण्याचा संघर्ष सध्या विकोपाला गेलेला आहे. पक्षाकडून पुतण्याला बळ मिळत नसल्याने बीडमध्ये पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमाला हजेरी लावायची नाही अशी भुमिकाच येथील आमदारांनी घेतली आहे. काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस बीडला आले तेंव्हा राष्ट्रवादीच्या आमदाराने त्यांना आपल्या बंगल्यावर चहासाठी निमंत्रित करत राष्ट्रवादीला सतर्कतेचा इशारा दिला होता.

 

 

बीडच्या हल्लाबोल सभेची संदीप क्षीरसागर हे आठ दिवसांपासुन तयारी करत होते. हल्लाबोलची सभा बीड शहराच्या मध्यवर्ती भागात आयोजित करून संदीप यांनी चांगलेच क्रेडिट मिळवले आहे. सभेला झालेली गर्दी पाहुन भाषणातच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी संदीप क्षीरसागर यांचे सभा यशस्वी केल्याबद्दल कौतुकच केले. हे कौतुक एेकुण सभेसाठी आलेल्या संदीप यांच्या कार्यकर्त्यांनी टाळ्याचा कडकडाट करत जोरदार घोषणाबाजीही केली. तटकरे यांच्यानंतर भाषणास उठलेले धंनजय मुंडे यांनी सुरूवातीलाच संदीप यांचा आमचे जीवलग मित्र असा उल्लेख केल्याने पुन्हा टाळ्याचा कडकडाट झाला. सभेच्या शेवटी भाषणास सुरूवात करणारे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमधील काका-पुतण्याच्या सत्तासंघर्षावर बोलण्यास टाळले. पवार यांनी नोटाबंदीपासुन  कर्जमाफी, बुलेट ट्रेन,कपाशीवरील बोंडअळी, तुर खरेदी, कोरेगाव भीमा पर्यंतच्या विषयांचा भाषणात उहापोह केला. बीडचा विषय निघाला तेंव्हा पवार यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना टीकचे लक्ष करत साडेतीन वर्षात पालकमंत्र्यांनी काय केले, भुमिका स्पष्ट करावी असा मागणी केली. परंतु काका- पुतण्यातील वादावर बोलण्यास टाळले. समाजात आज अठरापगड  जातीला बरोबर घेवुन आपल्याला काम करायचे आहे. जाती-पातीच्या भिंतीच्या पलीकडे जावुन पक्षाला काम करायचे असल्याचे आवाहन पवार यांनी केले खरे पण पक्षातील गटबाजीवर पांघरून टाकले आहे. तर दुसरीकडे अंबाजोगाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांना डावलत माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सायंकाळी हल्लाबोल सभा घेण्यात आली आहे.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...