आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणे, मुंबईतील महिला अाणून वेश्याव्यवसाय; बीडमध्ये एका आंटीसह 5 जण ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- बीड पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून जिल्ह्यात वेश्या व्यवसायावर छापासत्र सुरु आहे. अंबाजोगाई, माजलगावनंतर मंगळवारी रात्री पुन्हा एकदा बीड शहरात छापा मारुन एका आंटीसह, दलाल आणि ग्राहक अशा पाच जणांना ताब्यात घेण्यात आले. एका पीडित महिलेची यातून सुटका करण्यात आली.   


मुंबई, ठाणे या भागातून महिलांना आणून त्यांच्याकडून एक महिला बीड शहरात वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यावरुन मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एएचटीयूच्या पोलिस उपनिरीक्षक दीपाली गित्ते, उपनिरीक्षक भरत माने यांनी सहकाऱ्यांसह धानाेरा रोड परसिरात एका घरावर छापा मारला. यावेळी आंटीसह ग्राहक उमेश आनेराव, अतुल मोरे (दोघे रा. शाहूनगर, बीड), रामा लांडगे (रा. गोविंदनगर, बीड) व एजंट संतोष भालेराव (रा. महापे हनुमाननगर, पनवले, जि. नवी मुंबई) यांना  ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात शिवाजीनगर पाेलिसांत गुन्हा नाेंद करण्यात आल्याची माहिती  पाेलिसांनी दिली.   

 

महिन्यात सहावी कारवाई

महिनाभरापूर्वीच अंबाजोगाईच्या एका लॉजवर छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर एका महिलेकडून वेश्या व्यवसाय करवून घेतल्याच्या प्रकाराने खळबळ उडाली होती तर त्यानंतर पुन्हा एकदा नाट्यगृह परिसरात वेश्या व्यवसायाचा भंडाफोड केला होता.   

 

अाई तुरुंगात  

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आंटीची आईही अशा प्रकारे व्यवसाय करवून घेत असल्याचे समोर आले आहे. काही वर्षांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यात अडकल्याने सध्या ती कारागृहात आहे. मात्र आईचा हा व्यवसाय मुलीने पुढे सुरू ठेवला. दोन दिवसांपूर्वीच मुंबईहून एक महिला तिच्याकडे आल्याची माहिती पोलिसांना कळली अन् मंगळवारी छापा पडला.   

बातम्या आणखी आहेत...