आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कठुआ व उन्नाव घटनेच्‍या निषेधार्थ परभणीत कडकडीत बंद; 4 बसेस फोडल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - कठुआ व उन्नाव येथील अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ शुक्रवारी  पुकारण्यात आलेल्या परभणी बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. बंददरम्यान संतप्त जमावाने काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकार केले. चार बसेसचे नुकसान झाले. बंददरम्यान काढण्यात आलेल्या मोर्चात हजारो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते.  


सर्वधर्मीय जातीय सलोखा मंच व मुस्लिम मुत्तहेदा महाज यांच्या संयुक्त विद्यमाने इदगाह मैदानावरून मोर्चा काढण्यात आला. नगरसेवक जान मोहंमद जानू, शकील मोहियोद्दीन, वसीम कबाडी, नगरसेवक सय्यद निजाम, मोहंमद अल्ताफ, कॉ. राजन क्षीरसागर, विजय वाकोडे, हाफिज सय्यद अहेमद, अॅड. विष्णू नवले पाटील, डॉ. अजवान खान, सुमीत परिहार, रवी सोनकांबळे, विशाल बुधवंत, नगरसेवक इम्रान खान आदींनी भावना व्यक्त केल्या.

 

चार बसेसवर दगडफेक
शुक्रवारचा परभणी बंद शांततेत सुरू असतानाच शहरातील मुख्य रस्त्यांवर प्रामुख्याने जिंतूर रस्त्यावर चार बसेसवर दगडफेकीचे प्रकार घडले. यात परभणी सेलू (एम.एच.२०-बीएल १२७०), जिंतूर-परभणी (एम.एच.२०-बीएल-२३१४) व जिंतूर-परभणी (एम.एच.२०-बीएल-११०४) आणि औरंगाबाद-निजामाबाद (एम.एच.२०-बीएल-४०५६) या चार बसेसच्या काचा फोडल्या. परिणामी एसटी महामंडळाने दुपारनंतर बस वाहतूक बंद केली.

बातम्या आणखी आहेत...