आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातंग आरक्षण संघर्ष समितीचे धरणे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - मातंग आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, अनुसूचित जाती आरक्षणाचे अ, ब, क, ड वर्गीकरणासाठी ठरावा पारित करण्यात यावा.

 

तसेच मातंग समाजाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे, यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे. या आंदोलनात मातंग समाजातील कार्यकर्ते हे पोतराजाच्या वेशभूषेत सहभागी झाल्याने ते लक्ष वेधून घेत होते.  आंदोलनात मातंग आरक्षण संघर्ष समितीचे राज्य कार्यवाह मारोती वाडेकर, माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर, अविनाश घाटे, सतीश कावडे, आनंद गुंडले आदी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

बातम्या आणखी आहेत...