आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रमेश कराड आमच्यासोबतच याची आम्हाला खात्री : धंनजय मुंडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - रमेश कराड हे मुंडे साहेबांचे पाईक होते. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षात घेतले त्यांना भाजपने उमेदवारी दिली नाही म्हणून आम्ही उमेदवारी दिली. परंतु एेनवेळी कराड यांनी घेतलेली माघार आमच्यासाठी अकलनीय असून त्याचे कारणही मला सांगता येणार नाही. ते याही क्षणाला आमच्या सोबत असून याची आम्हाला खात्री आहे.निवडणुकीनंतर सविस्तर खुलासा हाेईलच. जमल तर कराड व मी एकत्र खुलासा करेल, असे विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धंनजय मुंडे यांनी सांगितले.

 

मुंडे व काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षा रजनी पाटील यांनी बीड येथे  गुरुवारी सायंकाळी पाच वाजता राष्ट्रवादी भवनावर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. एेनवेळी कराड यांनी माघार घेतल्याने पक्षावर नामुष्की ओढावली, परंतु निवडणूक निकालानंतर यश दिसेल,असेही धंनजय मुंडे म्हणाले.

 
बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान आमदारांना खुद पक्षाकडूनच दूर ठेवले जात असल्याने गुरूवारी राष्ट्रवादी भवनावर झालेल्या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवने यांच्यासह आमदार अमरसिंह पंडित, माजी आमदार सय्यद सलिम, रेखा फड, पुतने  संदीप क्षीरसागर,माजी आमदार पृथ्वीराज साठे, अक्षय मुंदडा ही मंडळी उपस्थित होती. परंतु विद्यमान आमदार व माजलगाव येथील माजी मंत्री प्रकाश साेळंके गैरहजरी दिसून आली.

 

काँग्रेसबरोबर दिलजमाईचा देखावा 
बीड- लातूर- उस्मानाबाद या विधानपरिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड यांनी एेनवेळी माघार घेतल्याने राष्ट्रवादीची अडचण झाली. त्यामुळे आता काँग्रेसलाबरोबर घेऊन ही निवडणूक लढवल्या शिवाय पर्याय नसल्याचे लक्षात घेत गुरूवारच्या पत्रकार परिषदेस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकीशोर मोदी, जिल्हा परिषद सदस्य संजय दौंड, प्रा.टी.पी.मुंडे, माजी आमदार राजेंद्र जगताप ही मंडळी पत्रकार परिषदेसाठी दिसून आली.

बातम्या आणखी आहेत...