आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली: आखाडा बाळापूर येथे युवतीवर बलात्कार, तरूणास अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे एका अल्पवयीन आदिवासी युवतीचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ चित्रण करून त्या आधारे ब्लॅकमेल करून संबंधित आदिवासी तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   आरोपी  कृष्णा भिकाजी भंवर (१९) असे आरोपीचे नाव असून  त्याला पोलिसांनी अटक करून सोमवारी कळमनुरी न्यायालयात  हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.


अर्धापूर जि. नांदेड येथील रहिवासी असलेली  पीडित अल्पवयीन मुलगी कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे पाहुण्यांकडे आली होती.  आरोपी सोबत तिची ओळख झाली आणि त्याने तिला लग्न करण्याचे आमिष  दाखवले.  सदर तरुणी घरात अंघोळ करत असताना  कृष्णा भंवर याने तिचे २२ एप्रिल रोजी दुपारी १२ च्या सुमारास व्हिडिओ चित्रीकरण केले. याच व्हिडिओ चित्रिकरणाची क्लिप देण्यासाठी त्याने   तरुणीला ब्लॅकमेल करणे सुरू केले. रविवारी पीडित मुलगी व्हिडिओ घेण्यासाठी आल्यानंतर कृष्णाने तिच्यावर  अत्याचार केला. घटनेनंतर पीडित मुलीने थेट नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालय गाठून सर्व प्रकार कथन केला.  घटनास्थळ आखाडा बाळापूर हे असल्याने तिला नांदेड पोलिसांनी आखाडा बाळापूर येथे नेऊन फिर्याद देण्यासाठी मदत केली. तिने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी पहाटे अडीच वाजता पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटकही केली. याबाबत आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...